कजगाव सुवर्णकार समाज अध्यक्ष पदी विजय पोतदार यांची निवड

0

कजगाव ता भडगाव येथील सुवर्णकार समाजाच्या अध्यक्ष पदी विजय पोतदार यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी सुरेंद्र सोनार व सचिव म्हणून रत्नाकर सोनार यांची निवड करण्यात आली व नवीन कार्यकारणीत जेष्ठ सुवर्णकार समाज बांधवांना विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत

विठ्ठल मंदिरात सुवर्णकार समाज बांधवांनाच्या बैठकित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व भविष्यातील विविध उपक्रम राबवण्याचे ठरवण्यात आले व सर्वानुमते नवीन कार्यकरणी जाहीर करण्यात आली नवीन कार्यकरणीचे मावळते अध्यक्ष विठ्ठल सोनार व सचिव नितीन सोनार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी हरीशेठ देवरे भास्कर सोनार धनराज भालेराव विलास भालेराव रामेश्वर पांडे रमेश देवरे संजय सोनार कळवाडीकर सुरेश अहिरराव हिरालाल सोनार पंढरीनाथ सोनार पंकज दुसाने रोहिदास दाभाडे वीरेंद्र देवरे विजय अहिरराव अमोल सोनार जयेंद्र सोनार गोविंद देवरे मनोज सोनार गणेश विसपुते आदी उपस्थित होते यावेळी सूत्र संचालन संजय सोनार यांनी केले व आभार नितीन सोनार यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.