कजगाव येथील कोरोनायोद्धे रमेश राठोड यांची यशस्वी मात

0

कजगाव – गेल्या वर्षभरापासुन कोरोना विरोधात आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी फ्रंट लाईन वर्कर म्हणुन दिवस-रात्र कार्य करीत आहे.फ्रंट लाईन वर्कर म्हणुन कार्य करतांना कोरोना पाँझीटीव्ह रुग्णांची निकटचा संपर्क आल्यामुळे आरोग्य विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाची लागणही होत आहे.तसेच अनेक मृत्युही पावले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र कजगावला सात उपकेंद्र जोडले असुन त्यांत 23 खेडे आहे.गेल्या वर्षभरापासुन कजगाव परिसरात कोरोना पाँझीटीव्ह रुग्णांची खुप होती.त्यांत दुसऱ्या लाटेत हे प्रमाण वाढतच आहे.अशा परिस्थितीत कार्य करतांना प्राथमिक आरोग्य केंद्र कजगाव येथील अधिकारी व कर्मचारी पाँझीटीव्ह झालेले आहे.कजगाव येथील आरोग्यसहाय्यक रमेश राठोड हे काही दिवसापुर्वी पाँझीटीव्ह आले होते.योग्य वेळी योग्य उपचार झाल्यामुळे त्या कोरोनावर यशस्वी मात करुन आज पुन्हा कोरोना विरोधात आरोग्य सेवा देण्यास हजर झाल्या आहे.सदरप्रसंगी त्यांचा प्राथमिक आरोग्य केंद्र कजगाव यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

सदरप्रसंगी भडगाव तालुका वैद्यकिय अधिकारी डाँ.सुचिता आकडे,कजगाव येथील वैद्यकिय अधिकारी डाँ.प्रशांत पाटील,डाँ.स्वप्निल पाटील व सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होते.सत्कार प्रसंगी बोलतांना राठोड यांनी सांगितले की नागरिकांनी कोरानाची लपवु नये.दुखणे अंगावर काढु नये.लक्षणे दिसताच तात्काळ नजिकच्या आरोग्य केंद्रात जाऊन कोरोनाची तपासणी करुन घ्यावी.योग्य वेळी कोरानाचे निदान झाल्यास योग्य वेळी उपचार घेतल्यास कोरोना निश्चितच बरा होतो.तरी नागरिकांनी कोरोनाची तपासणी करुन घ्यावी.तसेच नागरिकांनी कोरोनाचे लसीकरण करुन घ्यावे.कारण कोरोनाची लाट रोखायची असेल तर लसीकरण होणे आवश्यक आहेत.लस घेतल्यावरही शासकीय नियमांचे पालन करावे.असे आवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.