कंडारीत विवाहित युवकाची आत्महत्या

0

भुसावळ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कंडारी येथील 30 वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.

आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. अनिल रमेश कोरी (वय 30, परदेशी, रा. नागसेन कॉलनी, साई पॅलेसजवळ) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी मयताचे भाऊ सुनील रमेश कोरी (42, नागसेन कॉलनी, साई पॅलेसजवळ) यांनी भुसावळ शहर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, मजुरी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या सुनील कोरी यांनी मंगळवारी पहाटे पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. साडेपाच वाजता कुटूंबीय उठल्यानंतर त्यांना ही घटना लक्षात येतात त्यांनी आक्रोश केला. पोलिस पाटील रामा तायडे शहर पोलिसांना घटनेची माहिती कळवल्यानंतर शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला. मयत कोरी यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगी, आई, वडील व दोन भाऊ असा परीवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.