कंडारीतील अल्पवयीन तरुणीची आत्महत्या

0

भुसावळ | प्रतिनिधी
तालुक्यातील कंडारी प्लॉट भागातील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. प्रियंका देविदास परदेशी (17) असे मयत तरुणीचे नाव आहे. याबाबत शहर पोलिसात देविदास रामधन परदेशी यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत तरुणीच्या पश्चात वडील, दोन भाऊ असा परीवार आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.