औषधी विक्रेत्यांना नाहक त्रास दिला तर, नाईलाजास्तव व्यवसाय बंद करावा लागेल ; अनिल नावंदर

0

खामगांव (गणेश भेरडे) :- बुलढाणा जिल्ह्यात कोरोना महामारीचे वाढते संक्रमण पाहता जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन घोषीत केले आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील मेडिकल दुकाने वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तरी सुध्दा पोलीस प्रशासनाकडून मेडीकल दुकानदार व कर्मचायांवर नाहक कारवाई होत आहे. यासंदर्भात मेहकर, लोणार, मलकापूर व खामगांव येथून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात १० मे रोजी रात्री ८ वाजेपासून ते २० मे च्या सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. या काळात वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीत मेडीकल २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकारी एस. राममूर्ति यांनी आदेशाद्वारे दिली आहे. मात्र जिल्ह्यातील पोलीस प्रशासन मेडीकल व्यवसायाशी संबंधीत व्यक्तींवर चौकशी न करता कारवाईचा बडगा उगारत आहेत.

याबाबत ११ मे रोजी मलकापूर येथील मेडीकलचा कर्मचारी व मुलगा औषधी पोहचविण्यासाठी जात असतांना त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन आरटीपीसीआर टेस्ट पाहिजे असे सांगीतले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. लोणार येथील प्रतिष्ठीत औषधी विव्रेâता यांना सुध्दा पोलीसांनी क्षुल्लक कारणावरुन मारहाण केली. अशा प्रकारे जिल्ह्यातून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील केमिस्ट बांधव हतबल झाले असून औषधी विक्रीचा व्यवसाय करावा की नाही? असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन केमिस्ट बांधव व कर्मचाNयांवर पोलीसांकडून नाहक होणारा त्रास थांबविल्या गेला नाही तर शनिवार दि. १५ मे पासून जिल्ह्यातील संपूर्ण केमिस्ट बांधवांना नाईलाजास्तव लॉकडाऊन मध्ये सहभागी व्हावे लागेल असा गर्भित इशारा अनिल नावंदर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.