ओबीसी राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान राज्यभर राबवणार

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पुरोगामी विचार सरणीचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ओ.बी.सी. समाजाचे राजकीय आरक्षण बचाव जनलढा उभारण्यासाठी जनसंपर्क अभियानची सुरवात होत आहे. ओ.बी.सी. नेते अनिल महाजन राज्यभर दौरा करणार आहे. ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी प्रयत्न असणार आहे.

सध्या  महाराष्ट्रामध्ये  चर्चेत  असणारा मुद्दा म्हणजे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले, त्याबाबत अनेक सामाजिक, राजकीय संघटनांनी मोर्चे आंदोलन सुरू केले आहे.  पण गेली पाच वर्षपासून ओ.बी.सी. समाजाला संघटन करून जागृत करण्याचे काम महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष व ओ.बी.सी. जनक्रांती परिषदचे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन हे करत आहेत.

ओ.बी.सी. समाजाचा अतिशय गाढा अभ्यास यांचा आहे. ओ.बी.सी. समाजातील तरुणांमध्ये अतिशय उत्तम संघटन कौशल्य अनिल महाजन यांचे आहे एक मोठा झंझावात राज्यात ओबीसी समाजामध्ये यांनी निर्माण केला आहे. माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली व शरद पवार यांच्या नेतृत्वात राज्यभर ओ.बी.सी. राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियानाची सुरवात महाराष्ट्र मध्ये करण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सर्व ओ.बी.सी. समाजातील घटकांना एकत्र करून लढा उभारण्यात येणार आहे.  असे यावेळी अनिल महाजन यांनी बोलतांना सांगीतले.

व्ही. पी. सिंग यांचे सरकार केंद्रात  असतांना मंडल कमिशन लागू करण्यात आले होते.  त्याची अंमलबजावणी शरद पवार मुख्यमंत्री असतांना ह्या बारामतीच्या वाघानेच सर्वात अगोदर ओ.बी.सी. समाजाला न्याय दिला आहे. छगन भुजबळ यांच्या मागणी वरून आणि पुढेही हेच शरद पवार एकनाथ खडसे ओ.बी.सी. समाजासाठी देवदूत ठरतील.   यात काहीही एक शंका नाही. बहुजनांचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनखाली ओ.बी.सी. नेते अनिल महाजन हे राज्यभर लवकरच दौऱ्यावर निघणार आहेत.  ओ.बी.सी. समाजाच्या राजकीय रद्द झालेले आरक्षण पुन्हा सुरू करावे,  यासाठी बारा बलुतेदार, आलुतेदार ओ.बी.सी. समाजाला जागृत करण्यासाठी जनलढा उभारण्यासाठी ओ.बी.सी. राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान  लवकरच सुरू करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.