एस. बी. अहिरराव यांना सेवानिवृत्ती बद्दल निरोप

0

पाचोरा :- गो. से. हायस्कुल चे जेष्ठ शिक्षक एस. बी.अहिरराव हे ३२ वर्षांच्या प्रदीघ सेवेनंतर दि. ३१ मार्च रोजी निवृत्त झाले. त्यांनी १२ वर्ष बांबरूड (राणीचे) व पाचोरा येथे २० वर्ष सेवा केली. निरोप प्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन व्ही. टी. जोशी यांनी त्यांचा सत्कार केला. मुख्याध्यापक एस.डी. पाटील, बी. एस. पाटील, आर. एल. पाटील व श्रीमती छाया सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी
उपमुख्यध्याक एल.एस. शिंपी, पर्यवेक्षक बी.डी. बोरुडे. सौ. पी. पी. पाटील, श्रीमती सी. एस. धुळेकर, सौ. पी. एम. वाघ, एम. एम. कॉलेज चे वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय चे उपप्राचार्य एस. एम. पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आप्तेष्ट, कुटुंबीय उपस्थित होते. एम. टी. कौंडिण्य यांनी सूत्र संचलन केले तर उज्ज्वल पाटील यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.