एरंडोल येथे लॉक डाऊनचे होतेय सर्रास उल्लंघन

0

एरंडोल (प्रतिनिधी) : येथे लॉक डाऊनचे सर्रास उल्लंघन होतांना दिसत आहे. काही ठिकाणी लोक विनाकारण गर्दी करीत आहेत.तसेच काही किराणा दुकानात व स्वस्त धान्य दुकानात मोठया प्रमाणात सोशल डिस्टनिंग चे पालन होतांना दिसत नाही आहे.लोक किराणा खरेदी करतांना व स्वस्त धान्य खरेदी करतांना गर्दी करीत असुन संबंधित दुकानदार सुद्धा या बाबी कडे दुर्लक्ष करतांना दिसत आहे.अनेक लोक मास्क न वापरता गावात खरेदी करतांना दिसत आहेत. यासाठी दुकानदाराने त्यांना आधी मास्क लावण्यास सांगावे व नंतर किराणा किंवा भाजीपाला द्यावा असे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.तसेच मास्क न लावणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी देखील मागणी जोर धरत आहे.

शहरातील बुधवार दरवाजा व म्हसावद नाका या परिसरात जास्त गर्दी चे प्रमाण असते.कारण त्या ठिकाणी किराणा व भाजीपाल्याची दुकानं जास्त आहेत.तसेच मारवाडी गल्लीतील स्टेट बँक जवळ सुद्धा काही प्रमाणात गर्दी दिसुन येते.नागरिकांना देशावर आलेल्या या महाभयंकर संकटाचे गांभीर्य अजुनही कळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.