उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर आज रात्री गोळीबार झाल्याचे वृत्त असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर आज रात्री गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे . हा गोळीबार पूर्व वैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात ते सुदैवाने बचावले असून ते आता तक्रार देण्यासाठी रामानंद नगर पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत.

कुलभूषण पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात प्रचंड वेगाने पुढे आले आहेत. जळगाव महापालिकेतील सत्तांतरात त्यांचा मोठा वाटा होता. याचमुळे त्यांना उपमहापौरपद मिळाले आहे . या पार्श्वभूमिवर आज थेट त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.