उद्यापासून नांदूरा स्थानकावर पूरी अहमदाबाद एक्सप्रेसला थांबा

0

सहा महिन्याचा कालावधी: प्रायोगिक तत्वावर एक मिनिट थांबा

भुसावळ :- रेल्वे विभागाने सहा महिन्याचे कालावधी करिता विविध रेल्वे स्थानकावर काही एक्सप्रेस गाडयांना एक मिनिटांचा थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नांदुरा रेल्वे स्थानकावर पूरी अहमदाबाद एक्सप्रेस ही गाडी एक मिनिटा करिता थांबणार आहे. सर्व प्रवाश्यानी झालेला बदल लक्षात घेऊन या सुविधेंचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

नांदुरा स्थानकावर गाड़ी क्रमांक 12843 /12844 पूरी अहमदाबाद एक्सप्रेस ही गाडी प्रायोगिक तत्वावर ८ मार्च २०१९ पासून एक मिनिटा करिता थांबणार आहे . तर गाडी क्रमांक 12843 ही नांदुरा येथे सायंकाळे ७. १४ वाजता येईल व अहमदाबाद कडे प्रवासाकरिता ०७.१५ वाजता निघेल. तसेच ही गाडी बुधवार, शुक्रवार, शनिवार ,रविवार या दिवशी सुद्धा सुरु राहणार आहे. गाडी क्रमांक 12844 नांदुरा येथून सकाळी 05.47 वाजता येणार आणि पूरी कडे पुढील प्रवासाकरिता 05.48 वाजता निघणार आहे. तसेच ही गाडी गाड़ी मंगळवार, शुक्रवार, रविवार, सोमवार या दिवशी सुद्धा सुरु राहणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.