उत्तरप्रदेशात विषारी दारूने घेतला 12 जणांचा बळी

0

बाराबंकी :- उत्तरप्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात विषारी दारूने 12 जणांचा मूत्यू झाला असून ४० जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची सर्व बाजूंनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिले आहेत. या घटनेमागे  राजकीय कारस्थान आहे का, याची चाचपणीही चौकशीदरम्यान केली जाणार आहे. दुर्घटनेनंतर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल उत्पादन शुल्क विभागाच्या 10 तसेच 2 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. दरम्यान विषारी दारू प्यायल्याने मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

राणीगंज आणि जवळच्या गावांतील काही स्थानिक रहिवाशांनी रामनगर भागातील एका दुकानातून सोमवारी रात्री दारू विकत घेतली होती. रात्री दारू प्यायल्यावर मंगळवारी पहाटेपासूनच त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्या सर्वांना रामनगर आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यांपैकी १२ जण मृत्युमुखी पडले. १६ जणांना लखनौ येथील किंग जॉर्ज वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगण्यात आले. ते सर्व जण सध्या डायलीसिसवर आहेत. दरम्यान, सुमारे सहा जणांना बलरामपूर येथे आणि लखनौ येथील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, राज्याच्या महसूल आयुक्तांनी आणि सह व उपायुक्तांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.