उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार !

0

जळगाव : विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ओह माय गॉड’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश शुक्ला या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाचं नाव ‘निकम’ असे ठेवण्यात येणार असून चित्रपटाच्या कथेचे लेखन भावेश मंडालिया आणि गौरव शुक्ला करणार आहेत. दरम्यान, या बायोपिकच्या माध्यमातून निकम यांच्या जीवनातील कधीही न दिसलेली बाजू लोकांसमोर येणार आहे.

“गेल्या कित्येक वर्षांपासून मी एखादं पुस्तक लिहावं किंवा माझा बायोपिक यावा, अशी काहींची मागणी होती. मात्र मला ते मान्य नव्हते. माझ्या जीवनावर चित्रपट यावा, अशी माझी इच्छा नाही आणि तेवढा वेळही नाही. माझ्यावर अनेक खटल्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. परंतु माझ्याकडे या चित्रपटाची टीम आली आणि त्यांची संकल्पना मला पटली. कदाचित या चित्रपटातून अशी एखादी कथा प्रेक्षकांसमोर सादर होईल की ज्यातून लोक प्रेरणा घेतील. त्यामुळे या चित्रपटासाठी मी तयार झालो”, असे निकम यांनी या संदर्भात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.