इंधन दर जाहीर ; जाणून घ्या आजचा पेट्रोल-डीझेलचा दर

0

मुंबई : आज पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवला आहे.. आज गुरुवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झाला नाही. मागील महिनाभरात कंपन्यांनी केलेल्या दरवाढीने राज्यातील अनेक शहरात पेट्रोलने शंभरी गाठली आहे.आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १००.७२ रुपये झाला आहे. आज दिल्लीत पेट्रोल ९४.४९ रुपये झाले आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.९९ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९४.५० रुपये झाला आहे.

मुंबईत आजचा एक लीटर डिझेलचा भाव ९२.६९ रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८५.३८ रुपये आहे. चेन्नईत डिझेल ९०.१२ रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८८.२३ रुपये प्रती लीटर झाले आहे. भोपाळमध्ये पेट्रोल १०२.६१ रुपये असून डिझेल ९३.८९ रुपये झाले आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाने ७१ डॉलरचा टप्पा ओलांडला. बुधवारी ब्रेंट क्रूडचा भाव प्रती बॅरल ७१.३५ डॉलर झाला. त्यात १.२१ डॉलरची वाढ झाली. तर यूएस टेक्सासमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.११ डॉलरने वधारून ६८.६३ डॉलर झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.