आ. रत्नाकर गुट्टेंच्या अडचणीत वाढ; ईडीकडून पोल्ट्री जप्त

0

बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क

रासपचे गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची आणखी एक मालमत्ता ईडीच्या ताब्यात गेलीय. बीड जिल्ह्यातील पोल्ट्री ईडीनं जप्त केली आहे. रत्नाकर गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे.

त्यांनी सुमारे 635 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं म्हटलं जातं आहे. ईडीं यापूर्वी सुमारे 255 कोटी रुपयांची मालमत्ता आधीच जप्त केली आहे. आता पुन्हा ईडीने जप्तीची कारवाई सुरू केली आहे

शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी गेल्या आठवड्यात गंगाखेड शुगर एन्ड एजन्सी मिल ची सुमारे 100 एकर जमीन जप्त ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर आता परळी – अंबेजोगाई रोडवरील वरवई गावातील ही पोल्ट्री जप्त करण्यात आली आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांना पुन्हा एकदा ईडीने चौकशी साठी बोलावलं होतं. मात्र ,त्यांची तब्येत बिघडल्याने ते उपस्थित राहिले नाहीत.

रत्नाकर गुट्टे हे रासपचे गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यांनी सुमारे 635 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं म्हटलं जातं आहे. त्यापैकी सुमारे 255 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने आधीच जप्त केली आहे. त्यानंतर आता पुन्हा ईडीने जप्तीची कारवाई सुरू केली आहे

मालमत्ता जप्त करण्याची ईडीची एक प्रक्रिया असते. आधी ईडी तपास करते. हा तपास दोन पातळ्यांवर असतो. एक म्हणजे मनी लाँडरिंगची रक्कम शोधणे आणि दुसरं म्हणजे त्या रकमेची मालमत्ता जप्त करणे. या ईडीने प्रक्रियेनुसार मालमत्ता जप्त केली. त्यानंतर त्याची माहिती कोर्टाला दिली. PMLA कायद्यानुसार एखाद्या आरोपीची मालमत्ता जप्त केल्या नंतर त्याची माहिती कोर्टाला द्यावी लागते. त्यानंतर कोर्ट त्यावर शिक्कामोर्तब करत. त्यानंतर ईडी मालमत्ता आपल्या ताब्यात घेत असते. आमदार गुट्टे यांच्या मालमत्ते बाबत ही प्रक्रिया झाल्यानंतर आता त्याची मालमत्ता ईडीच्या ताब्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.