आ.अनिल पाटील व जयश्री पाटील यांनी घेतली सपत्निक लस

0

अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेरचे आमदार अनिल पाटील व जयश्री पाटील यांनी  ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केंद्रात जाऊन दोघांनी सपत्निक लस घेतली.

सध्या सर्वत्र कोरोना मोठ्या प्रमाणावर बळावला आहे. याचबरोबर शासनाने जनतेच्या सुरक्षेसाठी लसीकरण सुद्धा मोठ्या प्रमाणावर  सुरू केले आहे.यात ग्रामीण रुग्णालयात जाऊन आमदार अनिल पाटील व जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांनी दोघांनी लस घेतली. लसीबाबत अनेक शंका कुशंका नागरिक घेत आहेत.

मात्र कोणतीही शंका न घेता  जनतेने मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन  स्वतःची व कुटुंबाचे संरक्षण करून घ्यावे असे आवाहन आमदार पाटील यांनी यावेळी केले.यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी, पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.