आयुक्त डांगेजी आप आगे बढो, जलगाववाले आपके साथ है !

0

तब्बल 11 महिण्यानंतर जळगाव महानगरपालिकेला पूर्ण वेळ आयुक्त मिळाले. नवे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सोमवार दिनांक 29 मे रोजी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. अन कामाचा धडाका सुरु केला. सध्या महापालिकेत गाळेधारकांचा प्रश्‍न ज्वलंत असून तो प्रलंबित आहे. मनपा निवडणुकीपूर्वी म्हणजे तीन महिन्याच्या आत गाळेधारकांचा प्रश्‍न सोडविण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गाळेधारकांचा प्रश्‍न प्रलंबित असल्याने त्याचेकडून भाड्यापोटी मिळणारे उत्पन्न ठप्प असल्याने मनपा आर्थिक दृष्ट्या अडचणीत आलेली आहे . हा प्रश्‍न मार्गी लागला तर महिन्याकाठी म.न.पा चे उत्पन्न वाढू शकते . गाळेधारकांचा सोपा असलेला प्रश्‍न अत्यंत गुंता-गुंतीचा बनविण्यात आलाय . त्यामुळे नवे आयुक्त डांगे यांनी गाळेधारकाचा प्रश्‍न सोडविण्याचे जे आव्हान स्वीकारले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेव्हढे कमीच असेल. त्याचबरोबर मनपाला कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी त्याचे पहिले मिशन असेल ते म्हणजे मनपा कर्जमुक्ती होय. एक महिन्याच्या आत मनपाला कर्जातून मुक्त करण्याचे आयुक्त डांगेंनी ठरवले आहे. तेवढ्यासाठी डांगेंना जळगावला पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. जळगाव मनपा वर हुडको आणि जिल्हा मध्यवर्ती स. बँकेचे एकूण 500 कोटी रुपयाचे कर्ज आहे. या कर्जाचे हफ्ते आणि त्यावरील व्याजाचे हफ्ते भरण्यात मनपा हैराण झाली आहे . कारण आलेल्या उत्पनातून हफ्ते भरले जातात . विकास कामे करण्यासाठी पैसाच शिल्लक राहत नाही हि वास्तविकता आहे . कर्मचार्‍याचे पगार करण्याचा प्रश्‍नही अनेकवेळा ऐरणीचं बनतोय. कारण वेळेवर कर्मचायांचे पगार होत नसल्याने कर्मचारी वर्गाची ओरड मात्र सुरूच असते. पैसेच नसल्याने मूलभूत सुविधांवर खर्च कार्यासाठी पैसे शिल्लक नसतात.
नुकतीच आयुक्त डांगे यांनी साने गुरूजी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयाच्या बंद खोल्यामध्ये दारूच्या बाटल्या आढळल्या . याचा अर्थ महानारपालिकेच्या मालमत्तेचा गैरवापर होतोय. हा प्रश्‍न गंभीर असल्याची दखल आयुक्तनी घेतली आहे. त्यामुळे बेकायदा धंदे करणार्‍याचे धाबे दणाणले आहे. आयुक्तांनी स्पष्ट केले आहे कि, वर्षभरात अमृत योजनेचे काम पूर्ण होईल . त्यानंतर रस्त्याच्या कामांना सुरवात करण्यात येईल. रस्त्यात एकही खडडा राहणार नाही . अशाप्रकारचे रस्ते जळगावकरांना मिळतील तेव्हा जळगावकर नागरिक आयुक्त डांगे यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही . कारण गेल्या 25 वर्षांपासून जळगावकरांना चांगले रस्तेच माहिती नाही. खड्डेयुक्त रस्त्याचा त्यांना वापर करावा लागत आहे. त्यामुळे पादचार्‍यांसाठी फूट पाथतर माहितीच नाही. जळगाव शहर्‍याच्या अमृत योजनेचे काम जैन इरिगेशनतर्फे सुरु असून त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. जैन इरिगेशनतर्फे होणारे काम उत्कृष्ट दर्जाचे असून आयुक्त डांगे यांनी तसा शेरा मारला आहे.वर्षाभरानंतर जळगावकरांना शुद्ध स्वच्छ आणि भरपूर पुरेल इतके पाणी दररोज मिळणार आहे. तोपर्यंत जळगावकरांना दोन दिवस आड आणि तेही अपुरे पाणी मिळते . अधूनमधून वीजपुरवठा खंडित झाल्याने अथवा पाईप लाईन फुटल्याच्या कारणाने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. आमच्या आया बहिणींना डोक्यावर हंडे घेऊन भटकंती करावी लागतेय. पाणी पुरवढा तसे पाणी वितरणप्रणातील गलथानपणाला किमान नवे आयुक्त डांगे यांनी लगाम बसवावा हीच अपेक्षा. जळगाव शहरातील अनेक भागात विजेचे दिवे बंद असतात. विशेषतः शहराच्या मध्यभागातून जाणार्‍या महामार्गावरील पथदिवे बंद असतात . त्याचा परिणाम गंभीर अपघातहोण्यात होतो. त्यामुळे अनेकांचे प्राण जातात. त्यासाठी महामार्गावरील पथदिवे नियमित चालू असावेत हीच अपेक्षा .तेथेही असणारा सावळा गोंधळ आयुक्त सुधारतील यात शंका नाही.
जळगाव शहरातील अतिक्रमणाचा प्रश्‍न गंभीर बनत आहे . आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी आपला मोर्चा तिकडे वळविण्याची गरज आहे. मनपाच्या जागेवर पक्के अतिक्रमणवर वेळीच कारवाई होण्याची आवश्यता आहे तथापि ती कारवाई होत नसल्याने अतिक्रणधारकांची हिंमत वाढते. हिंमत वाढल्याने त्यांची दादागिरी फोफोवते त्याना आळा बसविण्याची गरज आहे. पक्के अतिक्रणबरोबरच हातगाडीच्या हॉकर्सचे अतिक्रण सुद्धा जळगावकरसाठी डोकेदुखी बनली आहे. मनपाचा रस्ता जणू आमच्याच मालकीचा या अर्विभावाने हॉकारवाले रास्ता व्यापून टाकतात. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी तर पादचार्‍यांना त्या रस्त्यावरून चालणे अवघड जात. वाहनधारकांना तर वाहने चालवतांना कसरत करावी लागते . सुभाष चौक ,चौबे शाळा चौक , घाणेकर चौक , बळीराम पेठ , पोलन पेठ आणि घाणेकर चौक ते टॉवर चौक या रस्त्यावरून एकदा अचानक आयुक्तांनी फेरफटका मारावा म्हणजे सत्य चित्र त्यांना दिसेल ,त्याचबरोबर चित्रा टॉकीज चौक ते साने गुरुजी रुग्णालया पर्यंत रस्त्यावरील हात गाड्यावर अवैधरित्या होणार्‍या दारू विक्रेत्यांवर आणि त्या दारू पिणार्‍या दारुड्यावर तातडीने कारवाई करावी. कारण सायंकाळी या रस्त्यावरून महिला वर्गाला जाणे अवघड जाते. किंबहुना महिला या रस्त्याने जाणे टाळतात . हा प्रश्‍न अनेकवेळा उपस्थित करण्यात आला . तथापि कारवाई होत नसल्याने जैसे थे चालू आहे . दारू बंदी खाते मनपा कडे बोट दाखवून मोकळे होतात. पोलीस म्हणतात आमच्याकडे तक्रार द्या . अतिक्रमण विभागात गंबीरता आणि सुसूत्रता आणण्याची गरज आहे. शहराच्या आरोगयाचा प्रश्‍न आता पावसाळयात गंभीर बनणार नाही याची दाखल घेऊन आरोग्य खात्याची सफाई मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. शहरातून जाणार्‍या महामार्गालगत समांतर रस्त्याचा प्रश्‍न गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहे. त्यासाठी 125 कोटी रुपयांचा निधीसुद्धा उपलब्ध झाला आहे. परंतु डीपीआर मंजुरीचे कारण पुढे करून ते काम सुरु होत नाही .प्रभारी आयुक्त आणि जिल्याधिकार्‍यानी एप्रिलमध्ये समांतर रस्त्याचे काम सुरु होईल असे जळगावकरांना लेखी आश्‍वसन दिले आहे. प्रलंबित कामे आपण सुरु करा जळगावकर नागरिक तुमच्या पाठीशी आहेत एवढे मात्र निश्‍चित.

Leave A Reply

Your email address will not be published.