आमदार चव्हाण यांच्या ३१ जणांना जामीन मंजूर

0

जळगाव : महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुक शेख यांना दोरीने बांधून मारहाण केल्या प्रकरणी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना आज जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकर्‍यांसह जळगाव वीज परिमंडळाच्या कार्यालयात धडक दिली होती. येथे अधिक्षक अभियंता फारूक शेख यांना दोराने बांधून बांधावर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच परिमंडळ कार्यालयास कुलूप ठोकले होते. यामुळे मंगेश चव्हाण यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अभियंता फारूक शेख यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार चव्हाण यांच्यासह ४० ते ५० जणांवर भारतीय दंड विधान कलम ३५३, ३३२, १४३, १४७, १४९, ३५१, २९४, २६९, १८८, मुंबई पोलिस कायदा कलम १३५ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना पहिल्यांदा पोलीस कोठडी तर नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

दरम्यान, आमदार मंगेश चव्हाण यांनी जामीनासाठी अर्ज सादर केला होता. यावर काल सुनावणी पूर्ण झाली होती. तर आज न्यायालयाने त्यांच्यासह इतर सर्वांना जामीन मंजूर केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.