आमदार किशोर पाटील यांचा वाडे, बांबरुड परिसरात झंझावात !

0

– शिवसेना – भाजपा महायुतीचा आमदार किशोर पाटील यांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार !

पाचोरा (प्रतिनिधी) :- भडगाव येथील शिवसेना – भाजपा  महायुतीचे उमेदवार आमदार किशोर  पाटील यांनी आज भडगाव तालुक्यातील वाडे – बांबरुड या भागात प्रचार दौरा करीत जनतेचे आशीर्वाद घेतले. आमदार किशोर पाटील यांच्या या दौऱ्याला जनतेतून उत्स्फुर्द प्रतिसाद मिळत असून, परिसरातील जनता हजारोंच्या संख्येने आमदार किशोर पाटील यांना आशीर्वाद देत पुन्हा आप्पा तुम्हीच हे वचन देत आहेत.

या प्रचार दौऱ्यात आमदार पाटील हे मतदार संघातील जनतेचे माता भगिनींचे चरणस्पर्श करीत आशीर्वाद घेत आहेत. आजच्या वाडे – बांबरुड या दौऱ्यात आमदार किशोर पाटील यांनी विविध विकास कामे केल्याचा दावा करीत, मतदार संघ सुफलाम सुजलाम करण्यासाठी पुन्हा विजयाचे आवाहन करीत आहेत.

जनतेतून मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता आमदार किशोर  पाटील यांना भडगाव तालुक्यातून विक्रमी मताधिक्य मिळेल असा विश्वास शिवसेना – भाजपा युतीचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहे. या प्रचार दौऱ्यात आमदार किशोर पाटील यांच्या सोबत जि.प.सदस्य  भुरा आप्पा, पंचायत समिती सभापती रामकृष्ण पाटील, विकास तात्या, रावण भिल, तालुका प्रमुख विलास पाटील, अनिल पाटील, भावसाहेब पाटील, सतिष  पाटील, काशिनाथ महाजन, कैलास नाना, सुमित पाटील आदी शिवसेना व युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.