आमदडे येथे पत्ताचा अड्डावर धाड ; आठ जणांविरुद्ध गुन्हा

0

भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आमदडे गावात पत्ताचा अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव पोलिस उपविभागीय अधिकारी व भडगाव पोलिस स्टेशनच्या पथकाने धाड टाकली असता आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून रोख रक्कम व साहित्य जमा करण्यात आले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, सध्या कोरोना विषाणू मुळे सर्वत्र संचारबंदी असून तालुक्यातील आमदडे येथे पत्यांचा क्लब सुरू असल्याची गुप्त माहिती चाळीसगाव उपविभागीय अधिकारी कैलास गावडे यांना मिळाल्यानंतर त्यांचे पथक व भडगाव पोलिसांच्या पथकाने दि.११ रोजी दुपारी दोन वाजता घटना स्थळी धाड टाकली असता तेथे त्या ठिकाणी आठ जन पत्ते खेळताना आढळून आले म्हणून फिर्यादी – पो. कॉ. नंदकिशोर गोरख निकम यांच्या फिर्यादीवरून आरोपी – आप्पा केदार, संभाजी केदार, भाऊसाहेब केदार, दीपक जाधव, राहुल पाटील, संदीप पाटील, देविदास पाटील, दिनेश पाटील, हे पत्ते खेळताना आढळले व त्यांच्या जवळील ४५३० रुपये व पत्यांची क्यात जमा करण्यात आली आहे तसेच भाग ५ गु. र. न.१११/२०२० भा. द.वी. महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कलम १२ (अ) तसेच भारत देशात कोविड १९ या आजाराचे थैमान घातले असताना जिल्हाधिकारी जळगाव यांचे सी. आर. पी. सी.१४४ अनुवय संचारबंदी व जमाव बंदी आदेश काढला असताना सदर आदेशाचे उल्लंघन करून भादवी कलम १८८ सह मुंबई पोलिस अधिनियम १३५ चे उल्लंघन करून रस्तिय आपती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१( ब) जाणीवपूर्वक उल्लंघन केले म्हणून आठ जुगारीन विरूद्ध भडगाव पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. भगवान बडगुजर हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.