आपण नाराज असल्याची बातमी चुकीची ; खडसे

0

मुंबई :  भाजपवर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यानंतर विधानभवनात रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. खडसे आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास अर्ध्या तासाहून जास्त वेळ चर्चा झाली.  यामुळे एकनाथ खडसे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी आपण नाराज असल्याची बातमी चुकीची आहे असं स्पष्ट केलं.

यावेळी खडसे म्हणाले “शरद पवार यांची मी जळगावमधील सिंचन प्रकल्पाविषयी चर्चा करण्यासाठी गेला होतो.  उद्धव ठाकरेंशीही त्याबाबतच चर्चा केली. तसंच १२ तारखेला गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांच्याकडून स्वाभिमान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचं निमंत्रण देण्यासाठी आपण आलो होतो, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपण नाराज असल्याची बातमी चुकीची असल्याचं सांगितलं. “काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यामधील नेत्यांशी जवळीक आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता आल्यास आपल्याला फायदा होईल असं त्यांना वाटत असावं. पण याबाबत मी कोणताही निर्णय घेतलेला नाही,” असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं.

Leave A Reply

Your email address will not be published.