जळगाव : खेडीमध्ये पतीने पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. सोनी समाधान सावळे (रा. खेडी) असे या मृत महिलेचे नाव आहे. तर समाधान सावळे असे आरोपीचे नाव असून तो घटनास्थळाहून फरार झाला. दरम्यान. समाधान सावळे याने धावत्या रेल्वे खाली आत्महत्या केली आहे.
समाधान सावळे याने मध्यरात्री घरात असलेल्या लोखंडी कुर्हाडीने पत्नी सोनीबाई तिच्या गळ्यावर जोरदार वार करून तिची हत्या केली आहे. घटनास्थळाहून त्याने पळ काढला होता. दरम्यान, त्याने रेल्वे खाली आत्महत्या केली आहे.