आदिवासी क्रांतिवीर समशेरसिंग पारधी यांच्या स्मृतिदिना निमित्त पाणपोईचे उदघाटन

0

अमळनेर | प्रतिनिधी
येथील आदिवासी क्रांतिवीर समशेरसिंग पारधी यांचा काल 1 एप्रिल रोजी स्मृतिदिन या निमित्ताने आदिवासी एकता संघर्ष समिती च्या प्रदेशाध्यक्षा प्रा. जयश्री दाभाडे यांच्या संकल्पनेतून क्रांतिवीर समशेरसिंग पारधी चौकात पाणपोई चे उद्दघाटन करण्यात आले.
उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावे लागते. क्रांतिवीर समशेरसिंग पारधी चौक अत्यन्त गजबजलेला भाग आहे. ह्या भागात बाहेर गावाहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.त्याच प्रमाणे कामगार,मजूर मोठ्या संख्येने येथे उन्हा तान्हात काम करत असतात. त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय ह्या भागात कुठेच नसल्याचे लक्षात आल्याने प्रा जयश्री दाभाडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आज ह्या चौकात पाणपोई ची व्यवस्था केली.आदिवासी क्रांतिवीर समशेरसिंग पारधी हे आदिवासी पारधी समाजाचे थोर क्रांतिकारक होते. इंग्रजांविरुद्ध झालेल्या 1857 च्या लढाईत ते सहभागी होते.  द्वारकेच्या ओखा बेटावर वाघरी , वाघेर जमातीचे लोक राहत होते त्यांचे स्वताचे संस्थान होते या संस्थांसाठी गायकवाड , इंग्रज व वाघेर यांच्यात 1803 ते 1858 पर्यंत संघर्ष सुरू होता. 1803 मध्ये वाघेरानी  इंग्रजांचे  जहाज लुटले होते. असा हा संघर्ष अनेक वर्षे वाघेर व ब्रिटिश यांच्यात सुरू होता. 1818 मध्ये वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी समशेरसिंग पारधी यांनी स्वतःचे स्वतंत्र संस्थान बनवले होते.  समशेरसिंग  स्वतःचे सैन्य बळ होते   पारधी , फासेपारधी , वाघेर , काठेवाडी समाजाचे लोक त्यांना आपले प्रमुख मनात असत.   इंग्रजांनी हल्ला केल्यानंतर समशेरसिंग यांच्याजवळ बंदुका नव्हत्या तरी दगड , भाले , काठ्या , तिर , झाडाच्या फांद्यांनी इंग्रजांशी लढाई केली होती. इंग्रजांविरुद्ध आपला टिकाव लागणार नाही हे माहीत असतानाही प्रखर विरोध केला.  1858 ला  इंग्रजांनी पकडून १ एप्रिल १९५८ रोजी क्रांतिवीर समशेरसिंग पारधी यांना फाशी दिली. अशा या महान आदिवासी  क्रांतिकारकाला आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आगळी वेगळी आदरांजली अर्पण करण्यात आली.त्यांच्या समाजिकतेचा वारसा जपून ठेवण्यासाठी आदिवासी एकता संघर्ष समिती ने छोटासा प्रयत्न करत आगळी वेगळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  यावेळी क्रांतिवीर समशेर सिंग पारधी चौकाची देखभाल करणारा धनराज पारधी,विजय साळुंके, भुरा पारधी,राहुल बडगुजर,अय्याज बागवान,अजय देशमुख,मंगेश महाजन,संदीप मोरे उर्फ खली ,भीमराव पारधी,करण पारधी,उदय पारधी, बबलू पारधी,काऊ पारधी,अतुल पारधी,राजेश पारधी,किरण बडगुजर, करण पारधी,गोलू पारधी ,विक्की पारधी,गणेश पारधी,दंगल पारधी इ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.