आदर्श माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी मनीषा तोतला यांची निवड

0

जळगाव : येथील आदर्श माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी मनीषा तोतला यांची तर सचिवपदी अमिता सोमाणी यांची एकमताने निवड करण्यात आली. नुकताच झालेल्या पदग्रहण सोहळ्यात त्यांना पदभार देण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.

आदर्श माहेश्वरी महिला मंडळाच्या कोषाध्यक्षपदी सुवर्णा मुंदडा, जनसंपर्क अधिकारीपदी अरुणा मंत्री यांची निवड झाली. यावेळी माजी अध्यक्षांची विविध स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम भारती कोगटा व रेखा जाजू, द्वितीय सुधा मंडोरा व स्वाती सोमाणी, तृतीय शीतल मंत्री व पुष्पा दहाड यांच्यासह उत्तेजनार्थ गीता जाखेटे व श्रीकांता मणियार यांनी विजेतेपद मिळविले. तसेच यावेळी हळदी कुंकू स्पर्धादेखील झाली. यात तृप्ती काबरा, प्रतिभा काबरा, सुवर्णा मुंदडा, स्मिता सोमाणी, मोना कासट, लीना काबरा यांनी पारितोषिक पटकावले. परीक्षण निधी भट्टड आणि परमा गिल्डा यांनी केले. प्रसंगी संक्रातीचे वाण देण्यात आले.

यावेळी सर्व मंडळाचे अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख ज्योती लढढा, नम्रता काबरा, तृप्ती काबरा, शालू जाजू, प्रणाली देवपुरा, नेहा लाठी, सुषमा राठी, मधु तापडिया, स्वाती जाखेटे, कीर्ती मंडोरा, भाग्यश्री भैय्या, रिता मालपाणी, श्वेता जाजू, कंचन बडाले, सुलभा छापरवाल आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.