आडगाव येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी

0

यावल :- तालुक्यातील आडगाव येथ पूर्ववैमनस्यातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी व दगडफेक करण्यात आल्याची घटना रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान याप्रकरणी यावल पोलिसांनी दोघे गटातील काही लोकांना ताब्यात घेतले आहे.

आडगाव येथे हिंदू मुस्लिम या दोन तरुणांमध्ये मागील किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. यांचे रुपांतर काल दि. 12 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास दोन गटांमध्ये हाणामारी व दगडफेकीत झाले. यात काही नागरिक किरकोळ जखमी झाले असुन. दगडफेकीमध्ये गावाजवळ असलेले केळीच्या बागाचे पण नुकसान करण्यात आले असल्याचे समसते. यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.गावात कायदा सुव्यवस्था राहावी म्हणून जळगाव येथील दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. यावल पोलिसांनी दोन्ही गटातील काही लोकांना ताब्यात घेतले असुन गुन्हा दाखलचे काम सुरू आहे. पुढील तपास यावल पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.