आठवर्षीय मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट

0

आजी व आत्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल

चाळीसगाव,दि.5 –
आठ वर्षाच्या मुलीला तिच्या आत्याने कपडे धुण्याच्या बहाण्याने खदानीवर नेऊन तिथे पाण्यात ढकलून दिले व तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने मृत मुलीचा पिता, आजी व आत्या यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना तालु्नयातील तरवाडे परिसरात चार महिन्यापूर्वी घडली होती.
या घटनेची माहीती अशी की, तालु्नयातील खरजई येथील कोमल उर्फ नंदिनी गुलाब वैराळे (8 वर्षेे) हिचा दि.5/10/2018 रोजी तरवाडे शिवारात खदानीतील पाण्यात बुडून मृत्यु झाला होता. मात्र मुलीला खदानीच्या पाण्यात ढकलून देत तिचा खून केल्याचा आरोप तिच्या आईने केला. मृत कोमल हिची आई शालु गुलाब वैराळे (28) रा. खरजई, ह.मु. संजय गांधी नगर चाळीसगाव यांनी याबाबत चाळीसगाव न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार कोमल हिच्या मृत्युप्रकरणी शालु वैराळे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या फिर्यादीत शालु वैराळे यांनी म्हटले आहे की, कोमल हिस तिची आत्या निताबाई शंकर वैराळे ही कपडे धुण्यासाठी खदानीवर घेऊन गेली व तिला पाण्यात ढकलून दिले.कोमल बुडत असतांना तिला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. निताबाईसह पती गुलाब शंकर वैराळे व मिराबाई शंकर वैराळे या तिघांनी संगनमताने पुरावा नष्ट करण्यासाठी तिची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी गुलाब वैराळे, मिराबाई वैराळे व निताबाइ वैराळे सर्व रा. खरजई यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला भाग 5 गुरनं. 28/2019 भादंवि कलम 302, 201, 120ब, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र रसेडे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.