आठवडाभरात सोनं झाले दोन हजारांनी स्वस्त

0

मुंबई : मागील गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाल्याचे दिसून आले.  मल्टी कमोडीटी एक्सचेंजमध्ये आठवडाभरात सोनं दोन हजारांनी स्वस्त झाले आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव ४८६०० रुपयांच्या आसपास होता. शुक्रवारी तो ४६६०० रुपयांवर स्थिरावला.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) शुक्रवारी सोन्याचा भाव ४६६६० रुपयांपर्यंत खाली आला होत. त्यानंतर तो ४६८०० रुपयांवर स्थिरावला. त्यात १५८ रुपयांची घसरण झाली. एक किलो चांदीचा भाव ६७५८० रुपये असून त्यात १९ रुपयांची किरकोळ घसरण झाली.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज शनिवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७७३५ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेटचा भाव ४८३५० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६३९० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०४८० रुपये झाला आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४५४० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८५९० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६६१० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९३९० रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.