आगामी आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर; स्मिथ-वॉर्नरचे कमबॅक

0

सिडनी- आगामी आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने १५ खेळाडूंचा समावेश असणाऱ्या संघाची घोषणा केली. संघात अपेक्षेप्रमाणे स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे पुनरागमन झाले आहे. चेंडू कुरतडण्याप्रकरणी एका वर्षांची बंदी पूर्ण करून या दोघांनी नुकतेच क्रिकेटमध्ये कमबॅक केले होते. त्यामुळे त्यांचे राष्ट्रीय संघातीलही कमबॅक निश्चित मानले जात होते. या दोघांना वर्ल्ड कप संघात स्थान देताना जोश हेझलवूड आणि पीटर हॅंड्सकोम्ब यांना डच्चू देण्यात आले आहे.

गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच्या दोन वन डे मालिका ( भारत आणि पाकिस्तान ) जिंकल्या आहेत. त्यात स्मिथ व वॉर्नरच्या पुनरागमनामुळे खेळाडूंचे मनोबल अधिक उंचावले आहे. हॅंड्सकोम्बला वगळण्यात आल्याने ऑसी संघ अ‍ॅलेक्स करी या एकाच यष्टिरक्षकासह इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीचा ऑस्ट्रेलियन संघ खालीलप्रमाणे

अ‍ॅरोन फिंच ( कर्णधार)

उस्मान ख्वाजा

डेव्हिड वॉर्नर

स्टीव्हन स्मिथ

शॉन मार्श

ग्लेन मॅक्सवेल

मार्कस स्टोइनिस

अ‍ॅलेक्स करी

पॅट कमिन्स

मिचेल स्टार्क

झाय रिचर्डसन

नॅथनकोल्टर नायल

जेसन बेहरेनडोर्फ

नॅथन लियॉन

अ‍ॅडम झम्पा.

 

दरम्यान आज भारतीय संघाचीही घोषणा होणार असून संघातील १३ खेळाडू जवळपास निश्चित मानले जात आहे. उर्वरित दोन स्थानांसाठी राखीव यष्टीरक्षक, चौथ्या क्रमांकाचा फलंदाज, अष्टपैलू फिरकी गोलंदाज आणि अतिरिक्त वेगवान गोलंदाज असे चार पर्याय उपलब्ध आहेत. आज दुपारी राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीनंतर संघाची घोषणा होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.