अवैध धंद्यावर पोलिसांची तीन ठिकाणी कारवाई

0

वरणगाव :- वरणगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसानी परिसरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी सट्टा-पत्ता व गावठी दारुच्या भट्टीवर कारवाई केल्याने अवैध धंद्यावाल्यात खळबळ उडाली आहे.

भुसावळ तालुक्यातीत सावतर निभोरा शिवरात तापी नदी काठीवर वरणगाव पोलीस स्टेशनच्या सह पो.निरीक्षक सारीका कोडापे व पो.कॉ. अतुल कुमावत, अतुल बोदडे यांनी गावठी दारूच्या भट्टीवर छापा मारूण गावठी दारू बनविण्याचे सुमारे चोवीस हजार रुपये किंमतीचे कच्चे पक्के रसायण नष्ठ केले. तर शहरातील रामपेठ भागात मटका घेत व खेळत असताना मटक्याचे साहीत्य व बाराशे रुपये जप्त केले. याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला

Leave A Reply

Your email address will not be published.