मुक्ताईनगर येथे आ.खडसे यांच्या हस्ते शासकिय तुर खरेदीचा शुभारंभ

0

मुक्ताईनगर :- कृषी उत्पन्न बाजार समिती मुक्ताईनगर येथे नाफेड मार्फत शासकिय तूर खरेदीचा शुभारंभ माजी महसुल मंत्री आ एकनाथराव खडसे यांच्या हस्ते काटा पुजन करून करण्यात आला आणि पहिल्या पाच तुर उत्पादक शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी खा रक्षाताई खडसे, कृउबा सभापती निवृत्ती पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विलास धायडे, भाजप तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, पं स सभापती शुभांगीताई भोलाने,जि प सदस्य जयपाल बोदडे, निलेश पाटील, योगेश कोलते, पांडुरंग नाफडे,ख वि संघ अध्यक्ष प्रभाकर झोपे, चंद्रकांत भोलाने, सुनिल काटे, प्रशांत महाजन आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

तुर खरेदी दर 5675 रु क्विंटल असुन तुर विक्रीला आणण्यापूर्वी शेतकरी बंधूनी तुर पेरा असलेला सातबारा , बँक पासबुक झेरॉक्स ,आधार कार्ड झेरॉक्स घेऊन खरेदी विक्री संघ मुक्ताईनगर येथे नोंदणी करावी नोंदणी 10 मार्च पर्यंत सुरू असल्याची माहिती खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रभाकर झोपे यांनी दिली

Leave A Reply

Your email address will not be published.