अरे बापरे.. हुकूमशाहचे अजबच आदेश; हसण्यावर ११ दिवसांची बंदी

0

उत्तर कोरियात हुकूमशाह किम जोंग उन हे नेहमी चर्चेत असतात. हुकूमशाहाची सत्ता असल्याने लोकांना कोणते आदेश पाळावे लागतील सांगता येत नाही. रोज नवा आदेश देत लोकांवर करडी नजर ठेवली जात आहे. आता माजी नेते किम जोंग इल यांच्या १० व्या पुण्यतिथीनिमित्त उत्तर कोरियात शोक पाळण्यात येत आहे.

त्यामुळे जनतेवर ११ दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. या काळात देशातील जनता हसू शकत नाही, खूश होऊ शकत नाही आणि दारूही पिऊ शकत नाही. किम जोंग इल यांच्या निधनाच्या स्मरणार्थ लोकांनी कोणत्याही प्रकारचा आनंद व्यक्त करू नये, असे सक्त आदेश सरकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. किम जोंग इल यांनी १९९४ ते २०११ पर्यंत उत्तर कोरियावर राज्य केले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. किम जोंग इल यांच्या निधनानंतर त्यांचा धाकटा मुलगा किम जोंग उन याने देशाची सूत्रे हाती घेतली.

किम जोंग इल यांचा मृत्यू १७ डिसेंबर रोजी झाला होता. वयाच्या ६९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांनी १७ वर्षे देशावर राज्य केले. हा शोक दरवर्षी उत्तर कोरियामध्ये १० दिवसांचा असतो. मात्र यावेळी त्यांच्या निधनाला १० वर्षे पूर्ण झाल्याने ११ दिवसांचा केला आहे.त्यामुळे या दिवशी कुणीही बाजारात वस्तू खरेदी करण्यासाठी जाऊ शकत नाही. जर नियमांचं उल्लंघन केल्यास वैचारिक गुन्हेगार म्हणून अटक करण्यात येणार आहे. इतकंच काय तर, कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाला तरी, त्यांना मोठ्याने रडण्याची परवानगी नाही आणि ते शोक संपल्यानंतरच मृतदेह बाहेर काढू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.