जिल्ह्यातील ‘कोरोना’ने तोडला रेकॉर्ड ; आज २९२ रुग्ण आढळले

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्ण संख्येचा आकडा २०० हुन अधिक आढळून येत आहे. जिल्ह्यात आज तब्बल २९२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आहे. आजपर्यंत हा सर्वाधिक मोठा आकडा मानला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५३०२ इतकी झाली आहे.

आज जळगाव शहर ८२, जळगाव ग्रामीण २०, भुसावळ १८, अमळनेर १२, चोपडा ०, भडगाव ०१, पाचोरा ०१, धरणगाव ०४, यावल १४, एरंडोल १७, जामनेर ३३, रावेर ०८, पारोळा १४, बोदवड १९, चाळीसगाव १७, मुक्ताईनगर ३१ व अन्य जिल्ह्यातील १ असे एकूण २९२ रुग्ण आढळले. दरम्यान, आज दिवसभरात ०८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत ३०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात ९६ रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत ३०७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.