अमेरिकेच्या मिसाईल हल्ल्यात इराणचा मेजर जनरल सुलेमानी ठार

0

इराक : अमेरिकेने गुरुवारी रात्री इराकची राजधानी बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी ठार झाले आहेत.   यासह आणखी आठ जणांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. इराकच्या सरकारी वृत्तवाहिनीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

वृत्तानुसार, कासिम सुलेमानी यांचा ताफा बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जात असताना अमेरिकेकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून हाशेद-अल-शबिबी फोर्सचे उपप्रमुख अबू मेहदी अल मुहांदिसही ठार झाल्याची माहिती आहे. सुलेमानी यांच्यावर इस्त्राइलवर रॉकेट हल्ला केल्याचा आरोप होता. अमेरिका गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या शोधात होती.

कासेम सुलेमानी ठार झाल्यानंतर अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा राष्ट्रध्वज ट्विट केला. या ट्विटमध्ये काहीही लिहिण्यात आलेलं नसून फक्त राष्ट्रध्वज दिसत आहे.

 

दरम्यान, गेल्या वर्षापासून अमेरिका आणि इराणमध्ये प्रचंड तणाव आहे. अमेरिकेने इराणवर अनेक निर्बंध आणले आहेत. या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.