अमळनेर व मुक्ताईनगरला मिळाले नवीन उपविभागीय अधिकारी

0

जळगाव :- लोकसभा निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या सहायक पोलीस आयुक्त/पोलीस उपअधिक्षक पदावरील १८ अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश सोमवारी गृहमंत्रालयाने काढले.

गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, नाशिकचे पोलीस उपअधिक्षक राजेंद्र ससाणे यांची अमळनेर उपविभागात उपविभागीय अधिकारी पदी नियुक्ती कऱण्यात आली आहे. तर मुक्ताईनगर उपविभागाचे उपविभागीय अधिकारीपदी नंदुरबार येथील उपअधिक्षक संजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.