नंदुरबारात दोन गटात तुंबळ हाणामारी ; भाजपचे नगरसेवक जखमी

0

नंदुरबार : शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळेजवळ दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत अनेक जण जखमी झाले आहे. पूर्ववैमनस्यातून माळीवाडा व हमालवाडा या भागातील दोन गट आमने सामने भिडले होते. या हाणामारीत लाठ्याकाठ्यासह हत्यारांचा वापर करण्यात आला आहे. या हाणामारीमध्ये भाजपाचे नगरसेवक आनंद माळी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रात्री नंदुरबार शहरात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. शहरात सद्यस्थितीत तणावपूर्ण शांतता आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात या दोन गटांमध्ये धुमश्चक्री सुरू होती. त्यातूनच ही मोठी हाणामारीची घटना घडल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी या हाणामारीच्या घटनेनंतर संशयितांची धरपकड सुरू केलीय.

Leave A Reply

Your email address will not be published.