अमळनेर येथे श्रीराम महायज्ञ उत्साहात संपन्न

0

बाजार समिती संचालक यांच्या पराग पाटील हस्ते सपत्निक पुजा

अमळनेर (प्रतिनिधी):– गेल्या शेकडो वर्षांपासुन प्रतिक्षेत असलेल्या अखंड भारताचे अराध्य दैवत श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीत आयोजीत करण्यात आले होते. यावेळी अयोध्येत श्रीराम मंदिर होण्याची स्वप्नपूर्ती होत असल्याने देशात उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण होते.या निमित्ताने ह्या भूमिपूजन सोहळा निमित्ताने तसेच देश कोरोनामुक्त व्हावा व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी भा ज पा नेत्या अॅड ललिता पाटील यांच्या निवासस्थानी भव्य श्रीराम यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.अॅड ललिता पाटील व प्रा शाम पाटील यांच्या हस्ते अभिषेक आणि पुजा करण्यात आली तसेच कृ ऊ बा संचालक पराग पाटील व देवेश्री पाटील यांच्या हस्ते होमहवन करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री आ गिरीष महाजन, मा मंत्री एकनाथ खडसे,मा आमदार स्मिता वाघ यांनी व्हिडिओ काॅन्फरसिंग द्वारे कार्यक्रमाला उपस्थिती दिली.

याप्रसंगी कृ उ बा समितीचे सभापती प्रफुल्ल पाटील,सिनेट सदस्य दिनेश नाईक, भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे,भिलाली मा सरपंच दिनेश माळी,योगआचार्य कमलेश कुलकर्णी, बाम्हणे उपसरपंच प्रकाश पाटील,सामर्थ प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमोल माळी,राहुल पाटील,मनोज बिऱ्हाडे,कुंदन माळी,पराग कोल्हे,जयंत महाजन आदि उपस्थित होते.यावेळी आचार्य सुनिल मांडे,सारंग पाठक व निलेश आसोदेकर यांनी पुजाविधी संपन्न केली.

Leave A Reply

Your email address will not be published.