अमळनेरात माजी सरपंचाच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा

0

अमळनेर | चार महिन्यांपूर्वी विवाहित तरुणी घरात एकटी असल्याची संधी साधत तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या दहिवद येथील तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. हा संशयित आरोपी जि.प. सदस्या मीनाबाई पाटील व माजी सरपंच रमेश पाटील यांचा मुलगा आहे.

चार महिन्यांपूर्वी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दहिवद येथील २० वर्षीय विवाहित तरुणी घरी एकटी होती. तिचा पती शेळ्या चारायला आणि सासू-सासरे, नणंद शेतात गेले होते. यावेळी शेजारील चंद्रकांत रमेश पाटील याने बळजबरीने घरात घुसून तरुणीचे तोंड दाबून बलात्कार केला. घटना कोणाला सांगितली तर तिचा पती बकऱ्या चारायला जंगलात गेल्यावर विहिरीत फेकून देईल, अशी धमकी दिली. यामुळे महिलेने ही घटना कोणालाच सांगितली नव्हती. यानंतर चंद्रकांत हा वारंवार घाणेरडे इशारे करून तरुणीला धमकी द्यायचा. १९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता चंद्रकांतचा मोठा भाऊ अविनाशने महिलेच्या सासूला दारू पिऊन शिवीगाळ केली. विनाकरण भांडण केले. त्यावेळी तरुणीने तिच्यावरील अत्याचाराची घटना कुटुंबीयांना सांगितली. यानंतर २० जुलैला नातेवाइकांना घेऊन अमळनेर पोलिस ठाण्यात चंद्रकांत रमेश पाटील याच्याविरुद्ध विनयभंंग, बलात्काराचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झालेला तरुण हा जिल्हा परिषद सदस्याचा मुलगा आहे. दरम्यान, पीडित कुटुंब सकाळपासून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. गुन्हा मात्र सायंकाळी उशिराने दाखल झाला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.