अमळनेरात गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या !

0

अमळनेर : शहरातील साने नगरातील ३० वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी ५ च्या सुमारास घडली.

विजय उर्फ आबा साहेबराव पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याने स्वतःच्या घरी पत्र्याच्या शेडला असलेल्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. संजय बारकू पाटील यांनी अमळनेर पोलिस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास संजय पाटील करत आहेत. आत्महत्या का केली याबाबतचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.