अखेर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

0

पाचोरा :- नांद्रा तालुका पाचोरा येथे 10 मे रोजी ढंपर चालकाचा रोडर खाली येवून दाबल्या गेल्याने मृत्यू झाला होता. दरम्यान या वेळी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र चौकशी अंती त्याच्या मृत्यूस कारणीभूत घरुन रोडर चालकाविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र रोडर चालक घटने पासुनच फरार झाला आहे.

नांद्रा तालुका पाचोरा येथे चांदवड-जळगाव  रस्त्याचे काम सुरू असल्याने गावाजवळ खडीमशिन असून या खडीमशीन हुन रस्त्यासाठी खडी वाहीली जात आहे. दिनांक 10 रोजी डंपर चालक अंबू नारायण दौंडकर वय 40 रा.निमगांव ता. शिरुर जिल्हा पूणे हे खडी भरण्यासाठी गेले होते. खडी भरत असतांना डंपरचे मागचे फाटक उघडे असल्याने व आंधाराजी वेळ असल्याने अंबू दौडकर हा फाटक लावण्या आठी गेला असता खडी भरणारे रोडर चालक अखीलेश यादव रा. बिहार हा रोडर मागेपुढे करीत असतांना अंबू दौडकर हा चाकाखाली दाबला केल्याने त्यास जबरी मार लागल्याने त्यास उपचारासाठी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ अमित साळुंखे यांनी त्यास मृत घोषित केले होते. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांच्या चौकशी अंती रोडर चालक अखीलेश यादव हाच अंबू दौडकर याचे मृत्यूस कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाल्याने दिनांक 12 रोजी खडी मशीनचे मॅनेजर अभय दिनकर देशपांडे रा. छत्तीसगड ह.मु. नांद्रा यानी पोलीसात तक्रार दाखल केल्याने अखीलेश यादव यांचेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक पंकज शिंदे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.