अखेर खडकी येथील विवाहीतेच्या मृत्यू प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

0

 जामनेर (प्रतिनिधी): – तालुक्यातील खडकी येथील अंजना तानाजी नाईक (वय २३) या विवाहीतीचा दि.२५ रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता.त्यानतंर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. परंतु सासरच्या मंडळीनीच आमच्या मुलीची हत्या केली म्हणून अगोदर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन करावे अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी लावून धरली होती. यात्यानुसार मृतदेहाचे धुळे येथे शवविच्छेदन करण्यात आले असून पाच आरोपी विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्या नंतर महिलेच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

दरम्यान तहसिलदार अरुण शेवाळे यांना याबाबत निवेदन देण्यात आले होते.तर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्तासाठी बाहेरून कुमक मागविल्याने काही काळ पोलीस स्टेशनला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

मयतीचे वडील राजू लक्ष्मण तवंर रा.डोहरी तांडा यांच्या फिर्यादीवरून आज दि.२७ रोजी तानाजी कांतीलाल नाईक (पती), कांतिलाल गणपत नाईक ( सासरे),पार्वताबाई कांतिलाल नाईक (सासु), संभाजी कांतिलाल नाईक (दीर), गुड्डी यसाजी नाईक ( जेठाणी ) सर्व राहणार खडकी यांच्या विरोधात गु.र.न.२००/२०२० नुसार भा.द.वि.कलम ३०६, ४९८ (अ), ३२३ ,५०४ ,५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पाच ही आरोपीना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत. ४० गाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, पाचोरा विभागाचे पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.