अखेर आ.उन्मेश पाटील यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

0

चाळीसगाव :- चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र चा येथील माजी सैनिक सोनू महाजन यांना त्यांच्या घरी संगनमताने गैरमंडळी जमवून सोनू महाजन यांना मादरचोद आमच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करतो असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली, तसेच त्यावेळी आमदार उन्मेश पाटील, भावेश कोठावदे यास उद्देशून म्हणाले की मारून टाक या सोन्याला”फार माजला आहे, माझ्या विरुद्ध देखील तक्रारी केलेल्या आहेत,असे म्हणतात भावेश कोठावदे याने त्याच्या हातातील तलवारीने सोनू महाजन यांच्या डोक्यावर जिवे मारण्याच्या उद्देशाने वार करून जखमी केले, तसेच सोनू महाजन यांच्या धर्मपत्नी मनिषा महाजन ह्या आवराआवरी करण्यासाठी आली असता मनिषा महाजन यांना सूद्धा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, यावेळी मनिषा महाजन हिच्या गळ्यातील १४ ग्रॅम वजनाची ३३२००रुपये किमतीची सोन्याची पोत काढून घेतली व सोनू महाजन यांच्या खिशातील सत्तावीसशे रुपये काढून घेतले,व सोनू महाजन यांच्या मालकीची सिल्वर रंगाची,होन्डा कंपनीची अॅव्हेटर कंपनीची दुचाकी चोरून नेली प्रकरणी चाळीसगाव पोलिस ठाण्यात आज गु.नं १६२/२०१९ प्रमाणे आरोपी मुकुंद भानुदास कोठावदे भावेश मुकुंद कोठावदे भारती मुकुंद कोठावदे पप्पू मुकुंद कोठावदे लक्ष्मीबाई भानुदास कोठावदे बबड्या भूषण उर्फ शुभम बोरसे जितेंद्र वाघ सह आमदार उमेश पाटील यांच्यावर आय पी सी ३०७,३९५,३२४,१४३,१४७,१४९,५०४,५०६,सह आर्म अॅक्ट ४/२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.