ढोल-ताशांच्या गजरात परशुराम जयंती उत्साहात साजरी

0

भुसावळ : येथे ढोल-ताशांच्या गजरात परशुराम जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी सर्वशाखीय ब्राह्मण समाजातील बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परशुराम जयंती उत्सव समितीतर्फे या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. अष्टभुजा देवी मंदिरा जवळ भगवान परशुराम यांच्या पुर्णाकृती मुर्तीचे पुजन व आरती  भुसावळचे आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे,राजस्थानी विप्र समाज के अध्यक्ष कमलकांत  शास्त्री  यांच्या हस्ते करण्यात आली.

शोभायात्रेत कल्याण येथील राजमुद्रा ढोलताशा पथक खास आकर्षण होते. शिवाय फैजपूर येथील गुणवंत जोशी व त्यांच्या सहाकाऱ्यांनी सादर केलेल्या कसरती लक्षवेधी ठरल्या. खास मराठमोळा पोशाख देखील काहींनी केला होता. पांडुरंग टॉकीज,  लोखंडी पुल, हंबर्डिकर बेकरी, वसंत टॉकीज यामार्गे शोभायात्रा काढण्यात आली व  म्युनिसिपल पार्क  भागातील राम मंदिरा जवळ समारोप झाला. उत्सव समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, उपाध्यक्ष सागर पत्की, सचिव उमाकांत शर्मा, कोषाध्यक्ष अमोल जोशी तसेच डॉ. कमलकांत शास्त्री, प्र. ह. दलाल, रघुनाथ मांडाळकर, योगेंद्र दुबे, कैलास उपाध्याय, जयप्रकाश शुक्ला, पंडित रवीओम शर्मा, प्रशांत वैष्णव, गणेश वढवेकर, आशुतोष दलाल, गोकुळ दुबे आदींनी उत्सव यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

दरम्यान परशुराम जयंतीनिमित्त उत्सव समिती व समाजबांधवा तर्फे दि 6 रोजी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.