अखिल भारतीय अधिवक्ता परिषदतर्फे – जिल्हाधिर्‍यांना निवेदन!

0

जळगाव – भारत सरकारने लोकसभा आणि राज्यसभा या  दोन्ही सभागृहात पारित केलेला समर्थ आणि देश घडविण्यासाठी भारतीय नागरिकता संशोधन अधिनियम 2019 च्या कायद्यात रूपांतरित केल्याने त्याच्या समर्थनार्थ देशाचे महामहिम राष्ट्रपती व भारत सरकार याचे अखिल भारतीय अधिवक्ता परिषद जळगाव जिल्हा शाखावतीने सर्व वकील बंधू यांच्यातर्फे 19 डिसेंबर गुरुवार रोजी  जिल्हाधिकारी याना  निवेदन देण्यात आले.

तसेच भारतीय नागरिकता संशोधन अधिनियम 2019 चे समर्थन करीत आहे. या कायद्यात विरोध करून देशामध्ये जे काही देशद्रोहि वृत्तीचे लोक देशात हिंसा अराजकता पसरवीत आहे  अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करीत आहोत असे अखिल भारतीय अधिवक्ता जळगाव  जिल्हा शाखा च्या वतीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. यावेळी ऍड प्रवीण जंगले. ऍड प्रवीण झंवर. ऍड श्रीराम बारी. ऍड प्रकाश तळले. ऍड रघुनाथ गिरणारे. ऍड सुनीत चौधरी. ऍड अजय बडगुजर आदी पदाधिकारी उपस्थित होते व प्रसिद्धीपत्रकावर स्वाक्षरी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.