अंध,अपंग व विधवा कुटुंबांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप

0

पारोळा (प्रतिनिधी) : येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष करणं पवार यांनी आपल्या आई व तामसवाडी गणाच्या पंचायत समिती सदस्या सुजाता बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसा निम्मित अंध,अपंग व विधवा कुटुंबांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली

दि ७ रोजी पंचायत समिती सदस्या सुजाता पाटील यांचा वाढदिवस घरगुती पद्धतीने साजरा करून कोणताही वायफळ खर्च न करता शहरातील अनेक अंध,अपंग,व विधवा महिलांना, व कामगार कुटुंबांना घरपोच किराणा,भोजन,व संसार उपयोगी साहित्य वाटप केले. नगराध्यक्ष करणं पवार मित्र मंडळाचे सदस्य कैलास पाटील व त्यांच्या पथकाने झपाट् भवानी मंदिर परिसर,धोबी गल्ली आदी भागात सदर वस्तूंचे वाटप केले गेले.
या अगोदर प्रभाग २ मधील नगरसेविका अंजली करणं पवार यांनी ही आपल्या प्रभाग क्रमांक २ मधील राजीव गांधी भागात तांदूळ व इतर साहित्य चे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली एकंदरीत पवार कुटुंब सर्व सामान्य नागरीकांना आपल्या परीने मदत देत असल्याची भावना नागरिक बोलून दाखवीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.