वाढदिवसाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

0

पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील नगरदेवळा येथील गुजराती कन्या विद्यालयाचे उपशिक्षक डी. एस. पवार यांचा मुलगा धिरज याने आपल्या सतराव्या वाढदिवसाचा अपेक्षित एकूण खर्च २ हजार १०० रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन लोकांपुढे नवा आदर्श ठेवला आहे.

सध्या जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. संपूर्ण जग भयभीत झाले आहे. अशा परिस्थितीत भारतात व विशेषतः महाराष्ट्रात लॉक डाऊन असल्यामुळे सुजाण नागरिक शासन निर्देशांचे पालन करून घरातच बसून आहेत. मात्र वाढदिवस म्हटला की, प्रत्येक मुला – मुलींना आनंदाची भरती येते. आपला वाढदिवस थाटात साजरा व्हावा, अनेकांनी आपल्याला शुभेच्छा द्याव्यात, भेटवस्तू द्याव्यात असे सर्वच लहान थोरांना वाटतं. मात्र कोरोना आजाराची दहशत, भीती व जगभरातून कोरोना ने मृत्यू झालेल्या नागरिकांबद्दल ची सहिष्णुता जागृत झाल्याने आपणही कोरोना विरुद्धच्या लढ्यात सामील व्हावं असे  धिरज पवार याला वाटले. त्याने दि. ७  एप्रिल रोजीच्या  आपल्या वाढदिवसाचा अपेक्षित संपूर्ण खर्च मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे ठरवले. त्याच्या या संकल्पनेला भरभरून दात देत त्याची आई आश्विनी पवार (शिक्षिका – पी. के. शिंदे विद्यालय, पाचोरा) वडील – ज्ञानेश्वर पवार यांनी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांचेशी संपर्क साधला. व त्यानुसार दि. ७ रोजी तहसिलदार कैलास चावडे यांचेकडे २ हजार १०० रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नावाने जमा केला. धिरज पवार या मुलाचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील तमाम मुलांनी व पालकांनी या पद्धतीने मुख्यमंत्री सहायता निधीस मदत केल्यास आपण कोरोनाची लढाई सहज जिंकू असे भावोद्गार तहसिलदार कैलास चावडे यांनी यावेळी काढले. व पवार पिता पुत्रांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.