अखिल भारतीय जिवा सेनेच्या धरणगाव तालुका अध्यक्षपदी रवींद्र निकम

0

पाळधी, ता.धरणगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय जिवा सेनेच्या धरणगाव येथे झालेल्या बैठकीत धरणगाव शहर व तालुक्याची कार्यकारिणी जाहीर झाली यात अखिल भारतीय जिवा सेनेच्या धरणगाव तालुका अध्यक्षपदी रवींद्र शिवदास निकम व उपतालुका अध्यक्षपदी पाळधी येथील पत्रकार गोपाल रामदास सोनवणे यांची निवड करण्यात आली.  धरणगाव शहराध्यक्षपदी अमोल महाले व उपाध्यक्षपदी प्रशांत फुलपगारे यांची निवड झाली.  विभागीय अध्यक्षपदी प्राध्यापक बि एल खोंडे यांची नियुक्ती झाली.

सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिनेश महाले जळगाव जिल्हा अध्यक्ष देविदास फुलपगारे जिल्हा उपाध्यक्ष किशोर वाघ जिल्हा सचिव प्रा डॉ नरेंद्र महाले ज्येष्ठ सल्लागार नारायणराव सोनवणे यासह इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

धरणगाव तालुका अध्यक्ष रविंद्र निकम व उपतालुका अध्यक्ष गोपाळ सोनवणे व इतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबद्दल जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील धरणगाव पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नावरे यासह इतर सामाजिक व राजकीय व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.