लोकशाही न्यूज नेटवर्क
एरंडोल | तालुक्यातील खडके खुर्द येथे वैशाली प्रविण पाटील वय २४ वर्षे या महिलेने दि.११ जून २०२४ रोजी राहत्या घरात विष प्राशन केले होते. तिला उपचारासाठी जळगाव येथे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्यावर जळगाव सामान्य रूग्णालयात शव विच्छेदन करण्यात आल्यानंतर शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले
मयताचा व्हिशेरा हा रासायनिक तपासणीकरीता राखीव ठेवण्यात आला असून सुरक्षिततेच्या दृष्टीने जळगाव सामान्य रूग्णालयात ठेवण्यात आला आहे. याबाबत रविवारी रात्री एरंडोल पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत देशमुख व महेंद्र पाटील हे पुढील तपास करीत आहेत.