हवामान खात्याकडून राज्यभरात ‘येल्लो अलर्ट’ जारी

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

राज्यात अवकाळी पावसाचे (Unseasonal rain) संकट ओढवले असून कमी व्हायचे नाव घेत नाही आहे. हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. ज्यात किमान २ दिवस तरी ‘येल्लो अलर्ट’ (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. राज्यात पावसाचा तडाखा कायम अजून त्यात अनेक शेतकरी बांधवांचे आर्थिक नुकसान होत आहे. सकाळी कडक ऊन आणि संध्याकाळी पावसाळा असे दोन ऋतु अनुभवाला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाच्या पारा देखील ४० अंश सेल्‍सीअसपेक्षा अधिक आहे. मात्र सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास पावसाला सुरूवात होते.

पुण्यात देखील बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. सोसाट्याच्या वाऱ्यासह संध्याकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची सुद्धा दाणादाण उडाली होती. जवळपास पाऊणतास पाऊस पडला होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.