वयोवृद्ध इसमाचा रेल्वेतून पडून मृत्यू

पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन

0

मलकापूर, लोकशाही न्युज नेटवर्क : 

मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या शिरसोली शिवारात रेल्वेतून पडून एका ७० वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना १६ जून रोजी उघडकीस आली आहे. मृत वृद्धाची ओळख पटली नसून ओळख पटविण्याचे आवाहन मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिरसोली शेत शिवारात एका ७० वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह रेल्वे लाईन जवळ पडलेला आढळून आला. त्यामुळे त्याचा मृत्यू रेल्वेतून पडून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या वृद्धाची अद्याप ओळख पटली नसून ओळख पटवण्याचे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहेत.

 

या प्रकरणी उत्तम बाबुराव अढाव, वय ३८ वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. उल्लास मुके करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.