४० वर्षीय तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

0

 

मनवेल ता. यावल

तालुक्यातील दगडी  येथील एका ४० वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली व हा प्रकार कुटुंबींयाच्या निदर्शनास येताच या युवकाला तेथून काढून तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

दगडी  ता. यावल येथील रहिवासी प्रकाश विक्रम कोळी वय ४० रात्री जेवण करुन स्वतःच्या घरी झोपला होता. सकाळी काम करण्यासाठी उठविण्यासाठी गेले असता  राहत्या घरात त्याने छताच्या आसारीला दोरीने बांधून गळफास घेतला. हा प्रकार कुटुंब आणि नातेवाईकांच्या निदर्शनात येताच त्याला तातडीने एका वाहनात टाकून यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये आणण्यात आले.

 

यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पोलीस पाटील जीवन जयसिंग कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदिप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.