मेंढपाळ व काठेवाडी कुटुंब आपापल्या गावी परतीच्या मार्गावर

0

 

धानोरा ता. चोपडा

खरीप हंगामातील व मशागतीची कामे संपत आली असून पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. परिणामी रानावनातून चारा संपण्याच्या मार्गावर आहे. मेंढपाळ आणि काठेवाडी कुटुंबांना आपल्या गायी गुरांसाठी आणि धनगर बांधवांना आपल्या मेंढ्यांसाठी चारा मिळेनासा झाला आहे. त्यामुळे आहमदनगर, नाशिक, परभणी, गुजरात येथुन काही महीन्यापासुन आलेले मेंढपाळ कुटुंब व काठेवाडी कुटुंब चारा नसल्याने परतीच्या मार्गावर लागले आहेत.

 

रानावनात आढळतो हिरवळीचा चारा

चोपडा तालुक्यात मुक्या जनावरांना हिरवागार चारा व पाण्याची सोय होत असल्याने गुजरात मधुन काठेवाडी कुटुंब दरवर्षी या परिसरात येतात व पेरणी झाल्यावर परत आपल्या प्रपंच घेवुन आपल्या गावी जनावरांसह परत जातात. येथील शेतात फळबाग बागायती चारावर्गीय पिकासह इतर हिरवळीचा चारा रानावनात कायम असतो. त्यामुळे जनावरांना हिरवा व कोरडा चारा नेहमीच मुबलक मिळतो.

 

 

पावसाळा संपला की, खरीप हंगामाची पिके निघाल्यानंतर अहमदनगर नाशिक, गुजरात सोलापूर आदि ठिकाणाहुन मेढ्याचे व गुरांचे कळप वाड्यासह या परिसरात बसतात. या वेळी ज्वारी, बाजरी, मका, कापुस, केळी या यांसारख्या कोणत्याही पिकाची कापणी झाली की हे मेंढपाळ व काठेवाडी कुटुंब रानावनात उन्हात फिरुन जनावरांना चारा शोधतात.

 

 

शेतकरी लागला खरिपाच्या तयारीला

बैल, गायी, मेढ्या, बकरी, म्हैसी यांची यातून भागते. काठेवाडी व मेढ्यापाळ चाऱ्यासाठी शेत मिळवतात. त्याच शेतात थंडी, उन्हात काठेवाडी बांधवाचे व खटले व मेढ्यापाळाचे वाडे कुटुंबासह टाकले जातात. जनावरे सह कुटुबही ऊनवारा थंडी सहन करत आपलाही उदारनिर्वाह करतात. त्यात खरिप हंगामाच्या तयारीला शेतकरी लागला आसुन चाराही संपुष्टात आला आहे. आता जंगलात चाराच नसल्याने व शेतजमीनी ओस पडल्या असून चाऱ्याअभावी काठेवाडी व मेंढपाळ यांनी आपल्या गावाकडचा प्रवास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.